Type Here to Get Search Results !

मोहम्मद अयाज यांच्या ईद-मीलन कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची उपस्थिती अविस्मरणीय


सोलापूर : ईदुल फीत्र दिनी सोलापूर जिल्हा परिषदचे ब्रँड अॅम्बेसिडर तथा महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांच्या ईद मीलन कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, बद्दपट्टे सह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर पोलिस प्रशासन अधिकारी वर्ग तसे पत्रकार बंधुंनी ईद मीलन कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे अयाज यांनी पारंपरिक पद्धतीने सत्कार करुन आभार मानले. सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली, या वेळी सामाजिक एकता, बंधूप्रेम मोहम्मद अयाज यांच्या कार्यक्रमात दिसून आला.