Type Here to Get Search Results !

ऑनलाईन अर्ज भरताना येतात ' या ' तांत्रिक अडचणी : योगेश पवार

सोलापूर : लोकसभा मतदारसंघात https://suvidha.eci.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज दाखल करताना सदरची वेबसाईट ही ०५ मिनिटांनी ऑटोमॅटिक लॉगआऊट होते, पहिल्यापासून पूर्ण प्रोसेस करून सर्व गोष्टी भराव्या लागतात. काही वेळेस वेबसाईटचा अपलोंडिंग स्पीड एकदम कमी होत असल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचे योगेश पवार यांनी सांगितलंय.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार उर्फ वाय.पी. यांनी शनिवारी, १३ एप्रिल रोजी ऑनलाइन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात फिजिकली अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना १८ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ०२  वा. दरम्यानची वेळ देण्यात आलीय. ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आलेला मतदार संघातील योगेश पवार यांचा अर्ज हा उमेदवारीचा पहिला अर्ज आहे.

लोकसभा मतदारसंघासाठी ऑनलाइन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करताना काही तांत्रिक अडचणी येतात का हे पाहण्याबरोबरच काही उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यासाठी योगेश पवार यांनी अर्ज दाखल केल्याचे बोललं जात आहे.