Type Here to Get Search Results !

शीतल साबळे यांची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड


सोलापूर : बँकेतील निवृत्त अधिकारी आंतरराष्ट्रीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विजेते व VKGB/SC ST असोसिएशन चे लीडर ज्यांनी आजपर्यंत आपल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी नेहमीच सेवेसाठी तत्पर राहिले आहेत. आंबेडकरी चळवळीत नेहमीच एक सक्रिय सहभाग नोंदविला आहे, असे अशोक साबळे यांची कन्या शीतल साबळे यांची पंजाब नॅशनल बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झालीय.

आणखी एक विशेष - अशोक साबळे यांचे चिरंजीव अभिजीत साबळे हे कॅनरा बँकेत तसेच कन्या मीनाक्षी साबळे-भोसले व जावई अमोल भोसले हे स्टेट बँक या शासकीय बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शीतल साबळे हिचे VKGB परिवाराच्या वतीने तसेच सर्वच स्तरातून शुभेच्छांचा व  कौतुकाचा वर्षाव होत आहे.