Type Here to Get Search Results !

प्रा. डॉ. राज साळुंखे यांना 'सह्याद्री रत्न' पुरस्कार जाहीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते ०७ एप्रिलला होणार गौरव


सोलापूर : विविध क्षेत्रात उयोगदान देऊन सामाजिक कर्तव्य जोपासणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीमत्वांना दिल्या जाणाऱ्या मानाच्या 'सह्याद्री रत्न' पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी शारदा विद्यापीठ, सोलापूर चे अध्यक्ष तथा समाजसेवक प्रा. डॉ. राज साळुंखे यांची निवड करण्यात आलीय.  ०७ एप्रिलला पिंपरी चिंचवड येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते हा गौरव होणार आहे.

'चालता बोलता चहा' या प्रसिद्ध चहाच्या सहाव्या वर्धापनानिमित्त पिंपरी चिंचवड येथे युवराज छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोड, आमदार उमा खापरे, माजी आमदार सुजितसि़ग ठाकूर, मंगेश चिवटे, अशोक निंबर्गी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

प्रा. डॉ. राज साळुंखे हे गेली १५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. त्यांनी आजवर अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन यशस्वी केले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या मार्गदर्शनाची दखल घेतली गेली असून लंडन विद्यापीठ व मलेशिया येथे त्यांना शैक्षणिक चर्चासत्र व व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

त्यांना देशभरात अनेक ठिकाणी शैक्षणिक चर्चा सत्रे व मार्गदर्शनासाठी नामांकित संस्थांंकडून आमंत्रित केले जाते. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य व योगदान लक्षात घेऊन डॉ. साळुंखे यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. 

डॉ. साळुंखे यांनी शारदा विद्यापीठाच्या माध्यमातून आजवर अनेक शैक्षणिक परिषदा, महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, स्त्री भ्रूण हत्या विरोधात जागृती अशी अनेक समाजोपयोगी उपक्रम वेळोवेळी राबविले आहेत.  त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी त्यांना अनेक पुरस्काराने गौरविले आहे. 

डॉ. राज साळुंखे यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे.