सोलापूर : येथील सोशल महाविद्यालयाच्या उर्दू विभागाचे प्रा. डॉ. गौसअहमद शेख या॑ची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उर्दू व पर्शियन अभ्यास मंडळ विभागाच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी या निवडीबद्दल विद्या परिषदेच्या मिटींगमध्ये डॉ. शेख यांचा सत्कार केला.
डॉ. गौस शेख यांनी आतापर्यंत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर उर्दूमध्ये वेगवेगळ्या विषयात आपले शोध निबंध प्रसिध्द केले आहेत. ते विद्यापीठाच्या उर्दू विभागात संशोधक मार्गदर्शक म्हणून ही काम पाहत आहे. नऊ महाराष्ट्र बटालियन सोलापूर कॅप्टन या पदावर कार्यरत आहे.
यावेळी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्यासहित परिषदेचे सदस्य उपस्थित होते. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी, उर्दू विभागप्रमुख डॉ. शफी चोबदार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. जैनुद्दीन मुल्ला आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.