Type Here to Get Search Results !

मताधिकार दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर


सोलापूर :  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.  कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी, ०७ मे रोजी  मत प्रक्रिया होत आहे. निवडणुकीत मताधिकाराचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक ०७ मे २०२४ रोजी  या मताधिकार बजावण्याच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

तसेच राज्याच्या सीमेलगत असलेल्या राज्यांमधील जे मतदार, महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत, तथापि, त्यांची नावे सीमेलगतच्या राज्याच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना अधिसूचनामध्ये नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची सुट्टी केवळ मताधिकाराच्या दिवशी अनुज्ञेय असणार आहे, असे अपर जिल्हा दंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविलं आहे.