सोलापूर : जनावरांना अत्यंत निर्दयतेने, क्रूरतेने त्यांच्या चारा पाण्याची व निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था न करता, जनावरांची सुरक्षिततेची कसलीही काळजी न घेता बांधून ठेवल्याप्रकरणी चौघा कुरेशींविरुध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सद्दाम शुकूर कुरेशी, अब्दुला शुकूर कुरेशी (रा. तेलंगी पाच्छा पेठ), शोएब शुकूर कुरेशी आणि शहनशा शुकूर कुरेशी (रा. बेगम पेठ, सोलापूर) अशी आरोपितांची नावे आहेत. त्यांनी मोहमदिय्या मशिद समोरील कुरेशी गल्ली, माशाल्लाह बिफ मटन दुकानाजवळ शनिवारी सकाळी एक गाय व दोन वासरे निर्दयतेने बांधून ठेवल्याप्रकरणी पोकॉ/ १९०० अमिन यासिन शेख यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय. पोलीस हवालदार खान या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.