सोलापूर : जागतिक लिंगायत महासभा (कर्नाटक) लिंगायत समाजातील सर्वात मोठी संघटना असून एक शिखर संस्था म्हणून नावाजलेले आहे. जागतिक लिंगायत महासभा या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी विजयकुमार हत्तुरे यांची निवड झाल्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यापूर्वी, लिंगायत समाजाच्या चळवळीमध्ये विजयकुमार हत्तुरे यांचं मोठे योगदान असल्याचे आ. प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी, सोनार मामा, सिद्धेश्वर साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, मजरेवाडीचे बालाजी चौगुले, नितीन भोपळे, सौ. गीता वारे, गौराबाई कोरे, लहू कोरे, नागेश हत्तुरे, पप्पू पाटील, राजशेखर हत्तुरे, शैलेश शेवगार, नागेश पडनुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रणिती शिंदे म्हणाले लिंगायत चळवळीमध्ये विजयकुमार हत्तुरे यांचे मोलाचे योगदान असून ते नेहमी समाज हितासाठी कार्य करत असतात. मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, तसेच लिंगायत समाजातील विविध मागण्ण्यांसंदर्भात आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना हत्तुरे म्हणाले, राज्यभरात समाज संघटित करून संघटनेचा विस्तार करणार असल्याचे सांगितले. आमदार प्रणिती शिंदे नेहमी लिंगायत समाजाच्या पाठीशी उभे राहिल्या आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची सत्कार करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचं आभार मानतो.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कर्नाटक राज्याचे मंत्री एम. बी. पाटील, आळंदचे आमदार बी. आर. पाटील, अफजलपूर चे आमदार एम. आय.पाटील, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष धर्मराज काडादी, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, माजी आमदार रवी पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार शिवशरण(अण्णा) पाटील बिराजदार, शिक्षण महर्षी राजशेखर शिवदारे, अॅड. रामदास फताटे, श्री सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते, उमराणी चे महादेव भैरगोंडे (सावकार) आदीसह समाजातील विविध मान्यवरांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी मजरेवाडी परिसरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.