सोलापूर : चैत्री शुध्द एकादशी, १९ एप्रिल रोजी असून, या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपूर शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या जिविताला धोका व वाहतुकीस अडथळा होऊ नये, याकरीता जड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल दिनांक १७ ते २० एप्रिल २०२४ या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर शहरातून जाणारी शासकीय अन्नधान्य, डिझेल पेट्रोल गॅस सिलेंडर, ऊस वाहतुक करणारी वाहने वगळून जड वाहनांची वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत.
मोहोळ पोलीस ठाणे अंतर्गत शिवाजी चौकातून सांगोला कडे जाणारी वाहने मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला या पर्यायी मार्गाने जातील. वेळापूरकडे जाणारी वाहने मोहोळ-शेटफळ, टेंभुर्णी-वेळापूर या पर्यायी मार्गाने जातील. शेटफळ चौकातून वेळापूरकडे जाणारी वाहने शेटफळ-टेभुर्णी-अकलुज-वेळापूर तर सांगोलाकडे जाणारी वाहने शेटफळ-मोहोळ-कामती मंगळवेढा मार्गे सांगोला या पर्यायी मार्गाने जातील.
टाकळी सिंकदर येथून जाणारी जड वाहने टाकळी सिंकदर-कुरूल -मोहोळ-शेटफळ-टेभुर्णी अथवा टाकळी सिंकदर- कुरूल-कामती मंगळवेढा-सांगोला या पर्यायी मार्गाने जातील. कुरुल चौकातून सांगोलाकडे जाणारी वाहने कुरूल -कामती-मंगळवेढा-सांगोला तर वेळापूर कडे जाणारी वाहने–कुरूल- मोहोळ –शेटफळ- टेंभुर्णी- अकलुज-वेळापूर पर्यायी मार्गाने जातील. वेणेगांव फाटा येथून वेळापूरकडे जाणारी वाहने वेणेगाव-टेभुर्णी -अकलुज - वेळापूर तर सांगोलाकडे जाणारी वाहने वेणेगाव -शेटफळ –मोहोळ- कामती- मंगळवेढा मार्गे सांगोला या पर्यायी मार्गाने जातील.
वेळापूर पोलीस ठाणे अंतर्गत श्री ज्ञानेश्वर चौक येथून जाणारी वाहने वेळापूर- टेंभुर्णी- शेटफळ -मोहोळ - कामती मार्गे पुढे जातील. तर साळमुख चौकातून जाणारी वाहने साळमुख- वेळापूर - टेभुर्णी- शेटफळ- मोहोळ -कामती मार्गे पुढे जातील. तसेच सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत महुद चौकातून जाणारी वाहने सांगोला- मंगळवेढा- कामती- मोहोळ मार्गे पुढे जातील.मंगळवेढा-कोल्हापूर बायपास पुलाखालून जाणारी वाहने सांगोला-मंगळवेढा- कामती -मोहोळ -शेटफळ -टेंभूर्णी मार्गे पुढे जातील.
मंगळवेढा नाका येथून जाणारी जड वाहने मंगळवेढा- कामती- मोहोळ-शेटफळ- टेंभुर्णी मार्गे पुढे जातील करकंब-भासे पाटी येथून वेळापूर कडे जाणारी जड वाहने भोसे करकंब -वेणेगाव -टेंभुर्णी –अकलुज- वेळापूर या पर्यायी मार्गोने जातील तर वेळापूर सांगोला कडे जाणारी वाहने करकंब- वेणेगाव- शेटफळ -मोहोळ - कामती –मंगळवेढा- सांगोला मार्गे जातील. वाहनधारकांनी या बदलेल्या वाहतूक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सरदेशपांडे यांनी केलं आहे.