विषयावर शनिवारी रामलल्ला मूर्तिकार अरुण योगीराज यांचं व्याख्यान
सोलापूर : विकास सहकारी बँक व रोटरी क्लब ऑफ सोलापूर च्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, १६ मार्च रोजी सायंकाळी ०६.३० वा. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा झालेल्या भगवान श्री रामलल्लाची सुंदर व लोभस मुर्ती बनविणारे शिल्पकार अरुण योगीराज यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे.
यावेळी त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे, 'मेरे अनमोल क्षण, रामलल्ला के संग' अर्थात (My Journey With Ramlalla) असा आहे. व्याख्यान हिंदी व इंग्रजी मधून होणार असल्याचं प्रकल्प अध्यक्ष सी.ए. राज मिणियार यांनी सांगितलंय.
राजधानी दिल्ली येथे इंडिया गेट येथील नेताजी सुभाष चंद्र बोस तसेच केदारनाथ येथील आद्य शंकराचार्य यांची मूर्तीदेखील मूर्तिकार अरुण योगीराज यांनीच बनवली आहे. या दोन्ही मूर्तींचं अनावरणसुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
पत्रकार परिषदेस विकास बँकेचे अध्यक्ष कमलकिशोर राठी, उपाध्यक्ष राजगोपाल चंडक, रोटरी क्लब ऑफ सोलापूर च्या अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर, सचिवा विद्या मणुरे, पांडुरंग मंत्री, सलाम शेख आणि मनीष बलदवा उपस्थित होते.