Type Here to Get Search Results !

'बुध्दराष्ट्र प्रतिष्ठान' च्या अध्यक्षपदी संजय बनसोडे


सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त बुध्दराष्ट्र प्रतिष्ठानच्या नुतन पदाधिकाऱ्यांत अध्यक्षपदी संजय बनसोडे तर कार्याध्यक्ष अनिल खराटे यांची निवड करण्यात आलीय. संस्थापक अजित गादेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 

सन २०२४-२५ जयंती उत्सव मिरवणुकीमध्ये डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या न्यायालयाची प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात येणार आहे. भारतीय नागरिकांसाठी सर्वोच्च न्यायालय हे न्यायिक विचाराचे आदर्श असते, हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.

यंदाच्या कार्यकारिणीत, उपाध्यक्ष : आकाश गंटोल, अभि गायकवाड, सोनू वाघमारे, सोहन शिवशरण, अजय प्रक्षाळे, कार्याध्यक्ष अनिल खराटे, सेक्रेटरी सोनू गायकवाड, मल्लेश घागरे, विकी नारायणकर, सागर कांबळे, सहसेक्रेटरी: अजिंक्य कांबळे, राजन जेटीथोर, अदित्य चंदनशिवे, क्रिश शेंडगे तर सुदर्शन कांबळे, निलेश गादेकर (खजिनदार), रोहन गायकवाड, प्रदिप वाघमारे, विराज चौधरी (सोशल मिडीया प्रमुख) आहेत.

मिरवणूक प्रमुख म्हणून संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवणे, शांतकुमार साबळे, पिंटू सुर्वे, मल्लिनाथ रामशेट्टी, गजानन व्हटकर, सागर कदम, सत्यजीत वडाराव, प्रशांत गायकवाड, नितीन गादेकर, विजय गादेकर, अमोल शिंदे यांची निवड करण्यात आलीय.