Type Here to Get Search Results !

बेरोजगार उमेदवारांसाठी १४ मार्चला रोजगार मेळाव्याचं आयोजन


सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत गुरुवारी, १४ मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्ट्रीने हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला  असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त ह. श्री. नलावडे यांनी दिली .

या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, ट्रेनी, आय.टी.आय. बी.कॉम अशा प्रकारची एकूण १६० पेक्षा जास्त रिक्तपदे ४ उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी  https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असं आवाहन सहायक आयुक्त नलावडे यांनी केलं आहे.