Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजी तलावजवळील "रेल वन विहार" येथे झाडांना-पक्षांना पाणी देऊन ईको-फ्रेडली धुलीवंदन साजरे


सोलापूर : विजापूर रोड येथील रेल्वे वन विहार येथै श्री नीरज कुमार दोहरे (मंडल रेल प्रबंधक, सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली आजची धुळवड व होली चा सण झाडांसोबत इको फ्रेंडली रंगाचा उपयोग करून साजरा करण्यात आली.‌ येथे आकस्मित लागलेल्या आगीमुळे प्रभावित जवळपास १ हजार झाडांना टँकरने तसेच तेथील रहिवासी मोतेकर यांच्याकडून पाणी घेऊन हे स्तुत्य कार्य रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रैमींनी केला. 

याप्रसंगी प्रत्येक झाडाला जवळपास १० ते १५ लिटर पाणी देण्यात आले.  ०५ नवीन झाडांची सुध्दा लागवड करण्यात आली. त्याच बरोबर पक्षांची पाण्याची भटकंती होऊ नये, म्हणून तेथील झाडांवर पाण्याची सोय सुध्दा करण्यात आली.

शिवाजी कदम (वरिष्ठ मंडल संरक्षा‌ अधिकारी, सोलापूर) आणि अन्य वरिष्ठांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सर्वांनी वेळोवेळी या झाडांना पाणी देऊन संगोपन करावे. प्रत्येक वाढदिवसाला एक तरी झाड लावावे व वाढवावे, एक पाणी बोटल-एक झाड या संकल्पनेचा प्रामुख्याने वापर व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.


पोलीस हवालदार सुनील मोतेकर (विजापूर नाका पोलीस स्टेशन) यांचेकडून नेहमीप्रमाणे सहकार्य लाभले.  त्यामुळे दररोज ५०० लिटर पाणी उपलब्ध करून देण्यात येते. त्याच बरोबर असामाजिक उपद्रवापासू‌न संरक्षणासाठी यांच्याकडून मदतही मिळत असते. कदम यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणी कदम यांनी याप्रसंगी पर्यावरणाविषयी काव्यवाचन केले आणि झाडांचा सांभाळ करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी शिवाजी कदम (वरिष्ठ संरक्षा अधिकारी), बी. आर. भगत (सहाय्यक संरक्षा अधिकारी), दिलीप तायडे (सहाय्यक यांत्रिक इंजिनियर), पर्यावरण प्रेमी प्रवीण तळे, राजेश वडिशेरला (पद्म फौंडेशन), संत निरंकारी मंडळाचे सदस्य कालिदास कोरे, अनितापद्म फौंडेशनचे पवार आणि सदस्य, जयस्तुते फाउंडेशनचे प्रभारी शैलेश स्वामी व २५ युवक, पर्यावरण प्रभारी जितेंद्र आर. वाघमारे, यांत्रिक विभाग व संरक्षा विभागाची संपूर्ण टिम, रवी कदम, प्रतिभा कदम अशा जवळपास ६० लोकांनी आपले योगदान दिले. आगीने होरपळलेल्या झाडांना पुनर्जीवन देऊन अनोखी धुळवड/होली साजरा करण्यात आली. झाडांना पुनर्जीवित करण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा उल्लेखनीय सहभाग होता.