आगामी काळात विविध जाती-धर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे व सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापुर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार असा शमा इब्राहिम शेख (रा. राजीव नगर, प्लॉट नं. ३९ शांतीनगर, देवराज शाळेजवळ, सोलापूर) पोलीस दप्तरी लौकिक आहे. तिच्याविरुध्द शरिराविषयी गंभीर स्वरूपाचे एकुण ०२ गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे तिच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ साो, सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते. तिला २५ मार्च २०२४ रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेवुन सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलं आहे. तिला तडीपार केल्यानंतर हगलूर (ता. आळंद जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) येथे सोडण्यात आलेले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग ०२) अजय परमार, वपोनि/विजापुर नाका पोलीस स्टेशन दादा गायकवाड, दुपोनि/संगीता पाटील, सपोनि/शितलकुमार गायकवाड, पोशि/१४८९ रमेश कोर्सेगांव यांनी केली आहे.