सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश तमशेट्टी यांच्या मातोश्री सातव्वा सदाशिव तमशेट्टी यांचे शनिवारी, १६ मार्च रोजी सकाळी अशोक चौक परिसरातील राहत्या घरी वार्धक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर दुपारी चार वाजता रूपाभवानी परिसरातील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्या प्रसिद्ध वकील एड. सरोजनी तमशेट्टी आणि जय हिंद फूड बैंकेचे संचालक सतीश तमशेट्टी यांच्या आजी होत.