Type Here to Get Search Results !

दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश काँग्रेसला बळकटी देणारा : नाना पटोले


माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेसह अनेक पदाधिकारी उपस्थित 

मुंबई : येथील टिळक भवनात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले, चेतन नरोटे (शहराध्यक्ष, सोलापूर), जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक विनोद भोसले, VJNT  प्रदेश अध्यक्षा पल्लवी रेणके, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, डॉ. पृथ्वीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी माजी आमदार दिलीपराव माने यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी आमदार दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश काँग्रेसला बळकटी देणारा आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीपराव यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आमदार प्रणिती शिंदे यांनीही माजी आमदार माने यांचं काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.



पक्ष प्रवेशावेळी सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक सिद्धाराम व्हनमाने, माजी संचालक बाळासाहेब बिराजदार, जिल्हा परिषद माजी सदस्य अप्पासो काळे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, मार्केट कमिटीचे उपसभापती चंद्रकांत खूपसंगे, बाळासाहेब पाटील, ब्रह्मदेवदादा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, संचालक गंगाधर बिराजदार, सचिन चौधरी, तानाजी सिनगारे, शावरु वाघमारे, सुशील बंदपट्टे, महेश जोकारे, शिवाजी पाटील, खरेदी-विक्री संघाचे व्हा. चेअरमन मुरलीधर शिंदे, संचालक रवींद्र शिंदे, नितीन भोपळे, प्रताप टेकाळे, सरपंच बालाजी येलगुंडे, गोवर्धन जगताप, बाळासाहेब पाटील, हरिचंद्र राठोड, उमेश भगत, अरुण बिराजदार, नागेश बिराजदार, प्रथमेश पाटील, दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे, रवी राठोड, रावसाहेब पाटील, राम गायकवाड, इरण्णा पाटील, जगदेव अटकर, संजय जाधव, हरिचंद्र राठोड, राहुल देवकते, राजू गंगदे, गुरुनाथ कोटलगी, विकास पाटील, सचिन गुंड, इरेशा कोळी, श्रीशैल पाटील, भंडारकवठेचे माजी सरपंच चिदानंद कोटगोंडे, बापूराव पाटील, निखिल देशपांडे, शकील कुडले, सिद्धारूढ घेरडी, महादेव नरोणे, प्रमोद शिंदे, अंबादास कोळी, निंबर्गीचे उपसरपंच पीरसाब लवगिचे, माजी सरपंच अप्पासाहेब पाटील, हवालदार, विशाल भोसले, रेवणसिद्ध साखरे, रमजान नदाफ, भरत आकेन, व्यंकटेश पोतु, श्रीकांत मेलगे पाटील, महेश घाडगे, रवी कांबळे, प्रवीण साबळे, युवराज चव्हाण, अंतू देठे, विठ्ठल म्हत्रे, रणजित दवेवाले, नागेश म्हत्रे, राजशेखर पाटील, हणमंत मोतीबने, शाम पाटील, शिवलिंगगौडा पाटील, पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव, अजय सोनटक्के, ॲड. अजित पाटील, ओंकार जावीर, अजय रेवजे, गणपत बचुटे, सुनील पाटील, नानासाहेब पवार, जैनु शेख आदीसह सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी जि.प.,/पं.स./, ग्रा.पं.सरपंच,उपसरपंच,सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, विविध संस्था,काँग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.