सोलापूर/विजय आवटे : टाटा आपीएल फन पार्क चे आयोजन सलग सहा वर्ष बीसीआय माध्यमातून सोलापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट संघटना करीत आहे. देशात विविध भागात फन पार्क चे आयोजन करण्यात येते.
आपल्या सोलापुरात येत्या २३ व २४ मार्च तारखेला विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील मैदानावर दुपारी दीड वाजल्यापासून आपल्याला या सामन्याचे थेट पहायला मिळणार आहे.
पहिल्या दिवशी पहिला सामना पंजाब किंग्ज वि दिल्ली कॅपीटल व दुसरा सामना कलकत्ता नाईट रायडर्स वि हैद्राबाद सनराईज हे दोन सामने व दुसऱ्या दिवशी दोन सामने पहिला सामना राजस्थान रॉयल वि लखनौ सुपर जायंटस् दुसरा सामना राजस्थान टिटॅन वि मुंबई इंडियन 18×36 फूट मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार असून मागील पाच वर्षाचा अनुभव पाहता किमान पंचवीस हजार क्रीडाप्रेमीची उपस्थिती राहतील, असा अंदाज आहे.
प्रत्येक जण सामना पाहण्यासाठी तिकीट काढून याचा लाभ घेऊ शकत नाही, म्हणून यामुळे नेमके स्टेडीयममध्ये जे वातावरण असते, तोच अनभुव येथे अनुभवायला मिळणार आहे. ते विनामुल्य याशिवाय येथे खाण्यासाठी खाद्य पदार्थ, शीतपेय, पाण्याची व्यवस्था आदी करण्यात आली आहे. पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.
यासाठी आपण तर याच... ! आपल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांना पण घेवून स्टेडीयममधील क्रिकेट सामन्याचा अनुभव घ्यावा.
या टाटा फन पार्क आयोजनासाठी उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, सचिव चंद्रकांत रेंबूर्सू, खजिनदार संतोष बडवे, राजेंद्र गोटे, शिवा अकलूजकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी,सदस्य व खेळाडू परिश्रम घेत आहेत.