कासेगांव / संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगाव ग्रामस्थ व क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तालुका पोलीस स्टेशन येथे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सत्कार जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पोलीस स्टेशनचे विशेष महिला पोलीस उपनिरीक्षक गंपले मॅडम होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून साईबाबा विद्या मंदिर, दहिटणे च्या सहशिक्षिका राजश्री चेचे व फरजाना शेख, वैशाली पवार, वरळेगावचे ग्रामपंचायत सदस्या सौ. सुलोचना वाघ, बक्षी हिप्परगे ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा राठोड यांच्या हस्ते माता जिजाऊ माँसाहेब, माता रमाई आंबेडकर, माता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हणमंत पवार सर, लक्ष्मण महाडिक सर, दीपक सलवदे सर, प्राचार्य परमेश्वर हटकर, सुरेश पवार, वरळेगांवचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सखाराम वाघ, संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम कोळेकर, मुळेगांवचे उपसरपंच शिवराज जाधव, भाऊ ग्रुप चे छत्रगुण माने, बक्षी हिप्परगे चे ग्रामपंचायत सदस्य बालाजी यादव, सामाजिक कार्यकर्ते गौतम चौधरी, मधुकर दिलपाक, गोविंद निकम, शिवाजी राठोड, गणेश शिंदे, अक्षय पवार, जितेंद्र कांबळे आदींच्या उपस्थितीमध्ये जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पवार सर यांनी केले तर महाडिक सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.