Type Here to Get Search Results !

तुंगत, नारायण चिंचोली येथे ग्रामीण पोलीस दलाचा रूट मार्च


पंढरपूर : आगामी लोकसभा निवडणुकाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव तसेच आगामी लोकसभा निवडणूक मतदान आणि मतमोजणी च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या  अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत चिंचोली या गावातून शनिवारी, ०९ मार्च रोजी प्रमुख मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला.



 उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ सीआयएसएफ प्यारा मिलिटरी ची एक कंपनी, सोलापूर ग्रामीण आर सी पी येथील कमांडो पथक मौजे तुंगत, नारायण चिंचोली या गावातून मिरवणूक मार्गावरून व संमिश्र वस्ती भागातून त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, जय भीम नगर, तुंगत या भागातून या गावातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला.

 

सदर रूट मार्च करता डी वाय एस पी सी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांचा स्टाफ, मुख्यालय सोलापूर येथील कमांडो पथक आणि सी आय एफ एफ या सशस्त्र बलाची कंपनी असा फौज फाटा उपस्थित होता.