Type Here to Get Search Results !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महानगर प्रमुखांचं आवाहन


सोलापूर  :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक - २०२४ ची   आदर्श आचारसंहिता, १६ मार्चपासून लागू झालीय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नामफलक, भिंती रंगविलेले, राजकीय डिजिटल बोर्ड, सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या आपल्या पक्षाचे सर्व प्रकारचे बोर्ड झाकावे आणि भिंतीवरील मजकूर पुसून टाकावा, असे आवाहन शिवसेना महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी केलंय.

सोलापूर संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांचा आदेश, निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर लोकसभा मतदारसंघ यांच्या सूचना आणि सोलापुरातील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व वरिष्ठ पदाधिकारी व उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, आणि गटप्रमुख त्याचबरोबर प्रणित संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हे आवाहन करण्यात आल्याचं कारमपुरी यांनी म्हटलं आहे.