सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे नरोटे कुटुंबीयांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते. त्यात सुदैवानं जिवितहानी झाली नाही.
या दुर्घटनेत रोख ३५ हजार रुपये, टिव्ही, फ्रिज,ज्वारी, गहू, खते- बियाणे, जनावराचे खाद्य याच्या संपूर्ण प्रापंचिक साहित्याचा कोळसा झाला. त्यामुळे नरोटे कुटुंबिय उघड्यावर आलं. एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच ङोक्यावरचं छप्पर गमावलेल्या नरोटे कुटुंबाची भेट घेवून त्यांना आर्थिक मदत केली.
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील, येळेगावचे सरपंच संजय लोणारे, कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य सहाय्यप्पा कांबळे, सहदेव राऊतराव, स्थानिक पत्रकार, जळीतग्रस्त कुटुंबाचे प्रमुख बनसिद्ध नरोटे, कुटुंबीय व शेतकरी उपस्थित होते.