सोलापूर : येथील श्रीमती मंगलाबाई नारायणराव तुळजापूरकर यांचं वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. त्या मृत्यू समयी ८६ वर्षांच्या होत्या. जुन्या पिढीत त्या 'अन्नपूर्णा' या नावाने सुपरिचीत होत्या. रविवारी, ३१ मार्च रोजी सकाळी ८.३० वा. बाळे स्मशान भुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्याच्या पश्चात दैनिक स्वराज्य मध्ये कार्यरत असलेले व जुने दत्त मंदिराचे पुजारी राजेंद्र उर्फ राजाभाऊ नारायणराव तुळजापूरकर, विजय तुळजापूरकर व अंबादास तुळजापूरकर अशी तीन मुले व एक मुलगी व नातवंडे परत्वंड मोठा परिवार आहे.