Type Here to Get Search Results !

निमित्त उमेदवारीचं ... ! शुक्रवारी विचार विनिमय महाबैठक



सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघांत असलेल्या सर्व गावातील सकल मराठा समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांची शुक्रवारी, २९  मार्च रोजी सायंकाळी ४.०० वा. येथील छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात या ठिकाणी सोलापूर लोकसभा मतदार संघात एकास एक उमेदवार देणे आणि उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी विचार विनिमय महाबैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याचे सकल मराठा समाज च्या वतीने सांगण्यात आलंय.

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर (राखीव) लोकसभा मतदार संघातील सोलापूर शहरासह मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या सर्व तालुक्यातील सकल मराठा समाज व इतर बहुजन समाजातील बांधवांना या महाबैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

सकल मराठा समाज बांधवांसह इतर बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.या महत्वपूर्ण महाबैठकीतील चर्चा व विचारविनिमयाचा अहवाल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना, ३० मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे.