सोलापूर : सोलापुरातील उर्दू घर या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा गुरुवारी, ०७ मार्च रोजी सकाळी ११.०० वा. उच्च व तंत्रशिक्षण, वस्रोद्योग आणि संसदीय कार्य तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती उर्दू घर सांस्कृतिक समिती तथा प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.
तसेच उद्घाटन कार्यक्रमानंतर सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत गझल गायनाचा कार्यक्रम व सायंकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत उर्दू मुशायरा च्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून, जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग व्हावे असे आवाहनही प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.
.jpeg)