वडार समाजाचा सर्वांगीण उन्नतीच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

shivrajya patra

सोलापूर : वडार समाजाचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'मी वडार महाराष्ट्रा' चे संस्थापक तथा वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या आदेशानुसार बुधवारी सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे, दत्ता गायकवाड, दत्ता विटकर, शंकर चौगुले, लक्ष्मण विटकर, अशोक भरले, नवनाथ निंबाळकर, शंकर बा. चौगुले, मनोज पवार, देवराव सुकळे, सौ.ज्योती चौगुले, मंजुळकर मॅडम,समाज बांधव व भगिनी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन दिले. 

संपूर्ण भारत देशामध्ये आपण आजादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहोत परंतु या ७७ वर्षाच्या कालखंडामध्ये अजूनही वडार समाज हा शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे, असं वडार समाज बांधवांचे दुःख आहे.

आजही पोटाची खळगी भरण्यासाठी वडार समाजाला गावोगावी भटकंती करावी लागत आहे. परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, अशा यातना वडार समाज कसे सहन करणार दरम्यान बुधवारी ' मी वडार महाराष्ट्राचा ' संघटनेचे संस्थापक विजय चौगुले यांच्या आदेशान्वये सोलापुरातील वडार समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांना देण्यात आले.

वडार समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टीसारख्या संस्थेची निर्मिती करावी, जातीच्या दाखल्यासाठी लागणारी १९६१ च्या अगोदरच्या पुराव्याची अट रद्द करावी, वडार समाजासाठी शासनाने स्वतंत्र घरकुल योजना राबवावी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, मागासवर्गीय समाजासारखे ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे, जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाची निर्मिती करावी, नॉन क्रिमीलेयरची अट रद्द करावी, पैलवान मारुती चव्हाण वडार विकास लवकर कारवाई करावी, अशा अन्य मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. 

""""""""""""

... अन्यथा वडार समाज रस्त्यावर उतरेल : रवी शिंदे

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. अजूनही वडार समाज विकासापासून वंचित आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून वडार समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने निवेदनाद्वारे केले असून अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही. तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावे, अन्यथा वडार समाज हा रस्त्यावर उतरेल, अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाज बांधवांनी दिली.



To Top