Type Here to Get Search Results !

सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार राम सातपुते यांना भाजपाची लोकसभेसाठी उमेदवारी


सोलापूर :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक - २०२४ करिता भारतीय जनता पक्षाने पाचवी यादी घोषित केली या यादीत १११ उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून सोलापुर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. या मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार आमदार कु. प्रणिती शिंदे विरूध्द राम सातपुते होणार असल्याचं निश्चित झालंय. 

भारतीय जनता पक्षाने सोलापूर (एस.सी.) २०१४ मध्ये अॅड. शरद बनसोडे यांना तर २०१९ मध्ये डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात राजकीय रणमैदानात उतरवले होते. डॉ. महास्वामी यांना मिळालेल्या मताधिक्यानं माजी गृहमंत्री शिंदे पराभूत झाले, मात्र खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी जातीच्या बोगस दाखल्याच्या आरोपामुळे कायम चर्चेत राहिले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षानं सोलापूर (मध्य) च्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आठवडाभर भाजपची चाचपणी सुरु होती.  राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांनी देशातील १११ उमेदवारांची पाचवी सूची जारी केली. त्यात राज्यातील ३ जागांचा समावेश आहे. त्यात सोलापूर लोकसभा मतदार संघाकरिता अखेर राम सातपुते यांच्या नावाची अंतिमतः घोषणा केलीय.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार राम सातपुते यांच्यात होऊ घातलेला सामना रंगणार आहे.