सोलापूर : अदखलपात्र गुन्हयात प्रतिबंधक कारवाई करण्याकरिता समक्ष बोलावले असता, मी येत नाही, तुझे क्या करनेका कर, असे म्हणून सहाय्यक फौजदारास शिवीगाळी करुन त्याची वर्दीवर गच्छी पकडून झोंबाझोंबी करण्यात आलीय. ही घटना मुस्लिम पाच्छा पेठेतील खलिफा अपार्टमेंटसमोर शनिवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडलीय. याप्रकरणी महिबुब अ.करीम हुमनाबादकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जेलरोड पोलीस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार जहिरोद्दीन निजामोद्दीन काझी यांनी एका अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी महिबुब अ.करीम हुमनाबादकर (रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) याला खलिफा अपार्टमेंटजवळील भंगार दुकानाजवळ बोलावलं होते. त्यावेळी महबूब हुमनाबादकर यांनी सहाय्यक फौजदार काझी यांना शिवीगाळी करीत गच्चीला धरून ढकलून दिले. तत्पूर्वी मी तुझ्याविरुद्ध खोटे आरोप करून सीपींकडे तक्रार करतो, मी तुला सोडणार नाही, अशीही धमकी दिली.
याप्रकरणी सहाय्यक फौजदार काझी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार महबूब हुमनाबादकर व त्याचा अनोळखी मित्र यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फिर्यादीनुसार जेलर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.