Type Here to Get Search Results !

केंद्राने महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश करावा : शरद गोरे


छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण; शाहिरांच्या हस्ते प्रथमच उद्घाटन.

सोलापूर /प्रतिनिधी  : साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती संभाजी महाराजांचे नाव केंद्र सरकारच्या महापुरुषांच्या यादीमध्ये नाही. ३२ वर्षाच्या आयुष्यामध्ये १२० लढाया न हरता जिंकणारे छत्रपती संभाजी राजे हे खरे धर्मवीर होते. त्यांनी चार ग्रंथ लिहिले साहित्याची सुरुवात ही त्यांनीच केली, अशा धर्मवीरांच्या नावाचा समावेश केंद्र सरकारने महापुरुषाच्या यादीत करावा, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी व्यक्त केले.

११ मार्च या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पंधराव्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी गोरे हे बोलत होते.



यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगोले हे होते. या साहित्य संमेलनाचे शाहीर रमेश खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

...यांचा झाला सन्मान !

कृष्णकांत चव्हाण - छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पत्रकाररत्न पुरस्कारसह इतर मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


मुंबई विद्यापीठाला द्यावं छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याकरिता व त्यांच्या कार्याचा तोलिक आणि मौलिक अभ्यास होण्यासाठी मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज देण्यात यावे अशी मागणी या संमेलनामध्ये करण्यात आली.

ग्रंथ प्रकाशन समिती स्थापन करावी.

छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण,नायिकाभेद, नकशिख, सातशतक असे चार मौलिक ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने ग्रंथ प्रकाशन समिती स्थापन करावी.