Type Here to Get Search Results !

बालाजी अमाईन्सच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणार्‍या यंत्राचे हस्तांतरण


तामलवाडी : बालाजी अमाईन्स च्या वतीने गुरूवारी, २९ फेब्रुवारी रोजी येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थींनीसाठी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणार्‍या यंत्राचे हस्तांतरण बालाजी अमाईन्सचे ऑफिस इन्चार्ज सावंत मारुती यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य वडणे सुहास यांना करण्यात आले.

यावेळी जि. प. प्रा. शाळा गोंधळवाडी या शाळेतील विद्यार्थींनीसाठीही देखील या यंत्राचे हस्तांतरण शाळेचे मुख्याध्यापक पिंपळे सर व तोटावाड सर यांना करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य वडणे सुहास यांनी बालाजी अमाईन्सचे आभार मानले.

आतापर्यत शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेतील वर्गखोल्या बांधकाम, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, १० वी. अपेक्षित प्रश्नसंच वाटप इ. असे अनेक कार्य बालाजी अमाईन्सच्या माध्यमातून झालेली आहेत. नेहमीच विद्यालयाला मोलाचे सहकार्य होत असल्याचे सांगितले.

यावेळी विद्यालयातील सर्व वर्गाच्या विद्यार्थींनी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.