Type Here to Get Search Results !

जेष्ठ नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन समुपदेशन करण्यासाठी पार पडली बैठक


सोलापूर : ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य समुपदेशन करुन तक्रारीचे निरसन करण्यासाठी गुरुवारी, २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा विशेष कक्ष येथे ज्येष्ठ नागरीकांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.

या बैठकीसाठी कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक  विश्वनाथ सिद, सहायक पोलीस निरीक्षक, श्रीमती स्वाती येळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती करुणा चौगुले, जिल्हा संरक्षण अधिकारी नागनाथ काळे, वन स्टॉप सेंटरचे केंद्र प्रशासक श्रीमती सुवर्णा गाडेकर, अॅवरनेस पिस अॅन्ड जस्टीस फॉऊन्डेशनचे इम्रान मंगलगिरी, महिला कक्षातील पोलीस अंमलदार सफौ. इब्राहिम पटेल, पोहेकॉ. ताजुद्दीन शेख, म. पोहेकॉ.लता राऊत, सफौ. अ. रजाक प्यारे, म. पोहेकॉ. वृषाली कन्हेरे, अनिस बेगम दलाल, पोहेकॉ. समीर होटगीकर, म. पोकॉ. वैशाली एकेली, शितल माने, सरस्वती घाडगे त्याचप्रमाणे अर्जदार ज्येष्ठ नागरिक व त्यांचे नातेवाईक असे हजर होते. 

या बैठकीत जेष्ठ नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना योग्य समुपदेशन करुन तक्रारीचे निरसन करण्यात आले.