१७ ऑक्टोबर २०२३ रोजी मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते सोलापूर महामार्गावरील देवडी पाटी येथे हॉटेल श्री साई समोरील मोकळ्या जागेत यातील अटक आरोपींच्या यांचे ताब्यात ३.०१० कि. ग्रॅम वजनाचे रू. ६,०२,०००००/- (सहा कोटी दोन लाख रू.) किंमतीचा मेफेडॉन (MD) नावाचा अंमली पदार्थ वहातूक करत असताना छापा कारवाईदरम्यान जप्त केला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ क, २२ क, २९ प्रमाणे दिनांक १८ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हयाचा तपास सुरेश राऊत करीत आहेत.
हा गुन्हा अंमली पदार्थाशी निघडीत असल्याने मा. पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन नमूद गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यांशी संबधीत सर्व आरोपीत यांना अटक करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा व मोहोळ पोलीस ठाणे यांना आदेशीत केले होते.
हे आरोपी हे चंद्रमौळी एमआयडीसी व चिंचोळी एमआयडीसी येथील कारखान्यात मेफेड्रॉन (MD) हा अंमली पदार्थ तयार करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्या कारखान्यांवर छापे घालून ते सिल करण्यात आले. गुन्ह्यातील उर्वरित आरोपी हे परजिल्हा तसेच परराज्यातील असूनन ते आपले वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत होते, असं पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व मोहोळ पोलीस ठाणेच्या पथकाने यातील आरोपीतांचा प्रयागराज उत्तरप्रदेश, रिवा मध्यप्रदेश, चेन्नई, बेंगलोर, हैद्राबाद, तेलंगणा तसेच गुवाहाटी आसाम या ठिकाणी जाऊन आरोपीतांचा शोध घेतला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकाने यातील आरोपी उत्तरप्रदेश येथील चित्रकुट जिल्हयातील बरगढ येथून, सहा. पोलीस निरीक्षक, सत्यजित आवटे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी कर्नाटक येथील बिदर जिल्हयातून आरोपी यांचा शोध घेऊन तसेच पोउपनि अमित करपे, मंद्रुप पोलीस ठाणे यांनी तेलंगणा येथील जहीराबाद येथून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
गुन्ह्यात आतापर्यंत एकुण १२ आरोपी यांना अटक करण्यात आली असून अटक आरोपीत यांचेकडून आतापर्यंत ८,८२,९९,२०४ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये मेफेड्रॉन (MD) हा अंमली पदार्थ तसेच अंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, गुन्हयात वापरण्यात आलेली वाहने, आरोपीचे मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या गुन्हयाचा मुख्य सुत्रधार हा कर्नाटक, तमिळनाडु, आंध्रप्रदेश, राजस्थान या भागातील अशा प्रकारच्या गुन्हयाचा मुख्य ऑपरेटर/सुत्रधार असुन याच भागात तो आपले अस्तित्व लपवून राहत होता, तसेच आपली राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता. या गुन्हयाचा मुख्य सुत्रधार/आरोपी हा कलबुर्गी, कर्नाटक येथे येणार असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या आधारे तात्काळ कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश निंबाळकर यांना आदेशीत केले होते. त्पाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे व पोउपनि सुरज निंबाळकर यांच्या पथकाने कलबुर्गी येथील लुंबीनी ग्रॅन्ड हॉटेल, कलबुर्गी येथे सापळा रचून शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. या आरोपीविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये कारवाई करण्यात येत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
त्याच्या चौकशीत त्याने अन्य 'पाहिजे' आरोपीची माहिती दिल्याने त्यास पोउपनि सुरज निंबाळकर यांच्या पथकाने हैद्राबाद येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार याचे राज्य व आंतर राज्य गुन्हे अभिलेख तपासणी करता त्याचेवर एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे विविध कलमाद्वारे सन २०१० पासून ते अद्यापपर्यंत महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यात खालील प्रमाणे एनडीपीएस कायदे अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यात
मोहोळ पो. ठाणे, सोलापूर ग्रामीण
मुरबागअली पो. ठाणे, कर्नाटक
खार पो. ठाणे मुंबई शहर
ओंगल पो. ठाणे, आंध्रप्रदेश
नाशिक रोड पो. ठाणे, नाशिक शहर
नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, चेन्नई
माणिकपुर पो.ठाणे, पालघर.
नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, हैद्राबाद
नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई
नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, अहमदाबाद यां पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (स्था.गु. शाखा) सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनि सुरज निंबाळकर व पथकातील ग्रेड पोउपनि राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, पोहेका सलीम बागवान, विजयकुमार भरले, मपोना/दिपाली जाधव, पोकॉ अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, यश देवकते तसेच सायबर पो. ठाणेकडील पोहेकॉ अभिजीत पेठे, पोना व्यंकटेश मोरे, पोकॉ महादेव काकडे यांनी पार पाडली.