२५-३० वर्षापूर्वीची महत्त्वाची कागदपत्रे-फाइल्स जळून खाक !

shivrajya patra

उजनी कालवा विभाग आवारातील २ खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी 

सोलापूर : सोलापुरातील गुरुनानक चौक परिसरात असलेल्या उजनी कालवा विभागाच्या आवारातील दोन खोल्यांना अचानक आग लागल्याने महत्त्वाची कागदपत्रे, फाइल्स आणि प्रकरणे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वा. च्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या होटगी रोडवरील अग्नी शमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वी संबंधित कार्यालयातील दस्तऐवज जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.



घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस स्टेशनमधील पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. आगीचे कारण अद्याप समजले नसून अधिक तपास पोलीस करीत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले अग्निशमन दलाचे अधिकारी अच्युत दुधाळ यांनी अधिक माहिती दिली.

२५ - ३० वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड या आगीत जळाले असून नवीन रेकॉर्डला धक्का लागला नसल्याचे या कार्यालयातील कार्यकारी अभियंता कोळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

To Top