Type Here to Get Search Results !

महासंस्कृती महोत्सव २०२४... ! स्थानिक कलाकारांकडून पारंपारिक लोककलांचे बहारदार सादरीकरण, रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

 

सोलापूरकर रसिकांनी पुढील तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर : स्थानिक कलाकारांकडून वासुदेव नृत्य, धनगरी ओवी, भारुड यासारखे पारंपरिक लोककलांचा कार्यक्रम शिवछत्रपती रंगभवन सोलापूर येथे महा सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या विविध बहारदार लोककलांच्या कार्यक्रमांमुळे सोलापूरकर रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमांना सोलापूरकर रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



स्थानिक कलाकाराने सादर केलेले वासुदेव नृत्य हे अप्रतिम होते. 'वासुदेव आला वो... वासुदेव आला' हे पारंपारिक वासुदेव गाणे व नृत्य आजही ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनावर भारुड घालते, तर धनगरी ओवीतून स्थानिक कलाकारांनी धनगरी जीवनपट उलगडून दाखवला. त्याच बरोबर भारुड व गजल गायनाने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

आजपासून सिटी एक्सीबिजन येथे होणार कार्यक्रम

महासंस्कृती महोत्सवाचे  कार्यक्रम दोन टप्प्यात होत आहेत.  सिटी एग्झिबीशन सेंटर,  सोलापूर  येथे दि २३ ते २५ फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रम  होणार आहेत. त्याचबरोबर शिवकालीन शस्त्रे,  शिल्पकला, जैवविविधता  तसेच वस्त्र दालन असे  विविध दालन पहायला मिळणार आहे.  दि. २३ फेब्रुवारी रोजी  श्री. कमलाभवानी मंदीर पार्किंग स्थळ, श्री देवीचा माळ, करमाळा या ठिकाणी देखील होणार आहे.



२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत पंडित भ‍िमन्ना जाधव, व्यंकटेश भ‍िमन्ना जाधव व कलाश्री जाधव  यांचा सुंद्रीवादन कार्यक्रम तसेच महाराष्ट्राची लोकधारा नृत्यविष्कार, प्रदर्शन दालने येथे सकाळी १०.०० ते रात्री ०८.०० वा. पर्यंत कार्यक्रम होणार आहे.दि. २४ फेब्रुवारी रोजी  “वंदे मातरम”  देशभक्तीपर गायन कार्यक्रम होईल. २५ फेब्रुवारी रोजी “गुढी महाराष्ट्राची” हा नृत्य नाट्य कार्यक्रम होणार आहे.      



राज्यातील विविध विभागातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ०५  दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा भरभरून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.