सोलापूर : राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव यंदाही विविध उपक्रमांनी साजरा होतोय. फेब्रुवारी रोजी शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाणार असून त्याच पार्श्वभूमीवर शिवस्मारक सभागृहात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची पूर्वनियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार तर खजिनदार सुशिल बंदपट्टे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी व्यासपीठावर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे, शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे, जयकुमार माने, मनीष देशमुख, दिलीप कोल्हे, राजन जाधव, अमोल शिंदे, माऊली पवार, विनोद भोसले, सुनील रसाळे, शिवाजीराव घाडगे गुरुजी, राजाभाऊ सुपाते, विनोद भोसले, विजय भोईटे, विजय पुकाळे, बाळासाहेब पुणेकर, बजरंग जाधव, नागेश ताकमोगे, श्रीकांत घाडगे, अंबादास शेळके, शिवकुमार कामाठी, प्रीतम परदेशी, प्रकाश ननवरे, राजू राजाभाऊ काकडे, विक्रांत मुन्ना वानकर, लहू गायकवाड, माऊली पवार, जयवंत सलगर, सुर्यकांत पाटील, जी. के. देशमुख सर, भाऊसाहेब रोडगे, प्रताप सिंह चव्हाण, जयवंत सलगर, निर्मला शेळवणे, स्वाती पवार, मुळे मॅडम, राजू आलुरे, आबा सावंत, माजी अध्यक्ष मतीन बागवान, लता फुटाणे, विवेक फुटाणे, सचिन स्वामी, देविदास घुले यांची उपस्थिती होती.
नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष - सुभाष पवार, कार्याध्यक्ष - रवि मोहिते, उपाध्यक्ष - अर्जुन शिवशिंगवाले, अंबादास सपकाळे, दिलीप बंदपट्टे, नागेश यलमेळी, मनिषा नलावडे, महिला सेक्रेटरी - लता ढेरे, सहसेक्रेटरी - सचिन तिकटे, खजिनदार - सुशिल बंदपट्टे, सहखजिनदार - गणेश माळी, मिरवणूक प्रमूख - महेश धाराशिवकर, उप मिरवणूक प्रमूख - नामदेव पवार, कुस्ती प्रमूख - बापू जाधव, अमर दुधाळ, प्रसिध्दी प्रमूख - वैभव गंगणे, बसू कोळी यांचा समावेश आहे. या निवडीनंतर नूतन कार्यकारिणीचा सत्कार सोहळा याप्रसंगी पार पडला.
या वेळी शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी विविध मंडळांनी स्पर्धा लावून डॉल्बिचा कर्कश आवाज वाजवून एकमेकांत चढा -ओढ करण्यापेक्षा लेझिमचे उत्कृष्ट डाव व मर्दानी खेळ सादर करावेत. सामाजिक उपक्रमांवर प्राधान्याने भर द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अखिल विश्वाला दिशा देणारे आहेत. मिरवणुका थाटात निघाल्याच पाहिजे, पण पारंपरिक पद्धतीने वाद्यवृंद लावून निघाव्यात, असे जाहीर आवाहनही केले.
तद्नंतर राजन जाधव यांनी त्यांच्या भाषणात प्रत्येक मंङळाच्या मिरवणुका छत्रपती संभाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक मंडळाने सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे आवाहन केले. माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी शिवजयंती मिरवणुकीत विसंवाद होणार नाही, याची प्रत्येक शिवभक्ताने काळजी घेणे गरजेचे आहे, असे म्हटले.
मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टीच्या वतीने वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशाचे सर्व मंङळांनी तंतोतंत पालन करणे आवाश्यक आहे. यंदाही शिवजयंती मिरवणूकीत २१ हजार शिवभक्तांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून या स्नेहभोजनाचा हजारो शिवभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमोल शिंदे यांनी यावेळी केले.
यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी प्रत्येक मंङळाच्या मिरवणुका जल्लोषात काढा, या मिरवणुका काढत असताना मध्यवर्ती मंङळ ट्रस्टच्या वतीने दिलेल्या आदेशाचे पालन करा आणि पोलिस प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन केले.
यानंतर माजी उपमहापौर दिलिप कोल्हे यांनी DJ व लेझिम अशा मंडळांच्या स्वतंत्र एक रांगा करुन त्या त्या मंङळांना दिलेल्या रांगानुसार जाण्याच्या सूचना करा, अशी विनंती मध्यवर्ती महामंडळाकडे आपल्या भाषणातून केली. या बैठकीस शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.