Type Here to Get Search Results !

लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा : डॉ. विशाल आंधळंकर


कै. नागेश करजगी यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी  शिबिर                  

सोलापूर : सोशल मिडिया च्या दुनियेत आज सगळ्याकडे मोबाईल आहे, जर घऱात पालक च तास न तास मोबाईलवर वेळ देत असतील तर त्यांचे अनुकरण लहान मुले करीत  असतात. त्यामुळे लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा,  असे प्रतिपादन  बालरोग तज्ज्ञ डॉ. विशाल आंधळंकर यांनी केले.               

कै. नागेश करजगी यांच्या जयंतीनिमित्त बाळे येथील एन. के. किड्स स्कूलमध्ये विद्यार्थांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. आंधळकर बोलत होते. फार्मासिस्ट योगीराज चाफेकर व संस्थेचे ट्रस्टी विकास कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.      


    

लहान मुलांना टिफिनमध्ये मॅगी-बिस्किट, कुरकुरे न देता, चपाती-भाजी चा सकस आहार द्या, म्हणजे मुले आजारी पडणार नाहीत, असं आवाहनही डॉ. आंधळकर यांनी यावेळी केले.              

प्रथमतः कै. नागेश करजगी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे, दिपाली कुलकर्णी, अश्विनी शिंगन, कोमल आदलिगे, पूनम कळसाइत, संगीता हेगडकर यांच्यासह विदयार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.