Type Here to Get Search Results !

चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात डी. बी. पथकाला यश; ०१.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


सोलापूर : जेलरोड पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला तीन गुन्ह्यातील दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश आलंय. त्यांच्या ताब्यातून ०२ मोटरसायकली व एक महागड्या किंमतीचा मोबाईल असा एकूण ०१ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलंय.

या वर्षात जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाखल गुन्ह्यापैकी मोटरसायकल चोरीचे ०२ गुन्हे आणि मोबाईल चोरीचा ०१ गुन्ह्याचा उकल करण्यात डी. बी. पथकाने यश मिळवलं.

या गुन्ह्यांच्या तपासात, वसिम इब्राहिम अत्तार (वय - २९ वर्षे, रा. संजय गांधी नगर, आसरिया मज्जिदजवळ, झोपडपट्टी नंबर ०२, विजापूर रोड, सोलापूर) याच्या ताब्यातून यामाहा मोटरसायकल (०५/२४),डीलक्स मोटरसायकल (०८/२४) हस्तगत करण्यात आल्या. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आकाश शिद्राम लिंबोळे (वय-२८ वर्ष, रा. गुल्लापल्ली झोपडपट्टी, मंगोडेकर यांच्या घराजवळ, रविवार पेठ, सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याजवळ ॲपल कंपनीचा महागडा मोबाईल जप्त करण्यात आला. या तीन गुन्ह्यात १. १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस माहिती कक्षातून सांगण्यात आले.

ही कामगिरी तत्कालीन पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल, सपोनि निलेश पाटील, सोनवणे, पोलीस हवालदार, शेख, धुमाळ, गंगावणे, माने, पोलीस नाईक बाबर, बागलकोटे, पोलीस शिपाई देखणे, वायदंडे, सिनारे, इंगळे, यसलवाड आणि गायकवाड यांनी पार पाडली.