सोलापूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दिनांक 03 फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवारी, 03 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वाजता पुणे येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर, कडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता पंढरपूर येथे आगमन. सकाळी 10.00 वाजता पंढरपूर येथे दर्शन, सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा कार्यकारी मंडळाचे तिसरे दोन दिवशीय अधिवेशनास उपस्थिती सायंकाळी 4.15 वाजता पंढरपूर येथून हेलिकॉप्टरने पुणेकडे प्रयाण.