Type Here to Get Search Results !

गोकुळ शुगर चे मुख्य शेती अधिकारी फकरोद्दीन जहागीरदार यांचं हृदयविकाराने निधन

 

कासेगाव/प्रतिनिधी : गोकुळ शुगर, धोत्रीचे शेती अधिकारी फकरोदिन शफीलसाब जहागीरदार याचं सोमवारी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पहाटे रहात्या घरी त्याना हृदयविकाराचा तीव्र स्वरुपाचा झटका आला होता, उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले.सुरू होते. किणी येथे संध्याकाळी वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

अतिशय शांत आणि संयमी व मनमिळाऊ स्वभावाचे असे शेती अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांच्या जाण्याने गोकुळ शुगर वर दुःखाचा डोंगर पसरला आहे. याबद्दल गोकुळ शुगर चे चेअरमन दत्ता शिंदे यांनी सांगितले की, शेती अधिकारी जहागीरदार यांचं योगदान निश्चित गोकुळ शुगर विकास करण्यासाठी लाभले आहे. त्याचं जाणं आमच्यासाठी खूपच वेदनादायी असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

यावेळी गोकुळ शुगरचे चेअरमन व्हाईस चेअरमन, व इतर सर्व कारखान्याचे पदाधिकारी व शेती विभागातील कर्मचारी व इतर गावातील सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी अंत्यसंस्कार वेळी उपस्थित होते.