Type Here to Get Search Results !

पंढरीत ‘पंढरी सायक्लोथॉन -२०२४’ चं भव्य आयोजन; क्रीडामंत्र्यांसह जिल्हाधिकार्‍यांची प्रमुख उपस्थिती


पंढरपूर : हल्लीच्या काळात अबाल वृध्दांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी तसेच प्रदुषणमुक्तीसह इंधन बचत होणेसाठी यासाठी आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकलींग असोशिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य अशा ‘पंढरी सायक्लोथॉन-२०२४’ चे आयोजन रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी केले असल्याची माहिती आयोजक तथा आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी दिली.

 वाढत्या जागतिक प्रदुषणमुक्तीसाठी अबाल-वृध्दांसह सर्वांनाच आता इंधनमुक्त अशा सायकलींचा वापर करणं काळाची गरज बनली असून यासाठी सर्वांनाच सायकलींगची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने पंढरपूर शहरात दरवर्षी पर्यावरणपुरक सायक्लोथॉनचे आयोजन केले जाते. 

यंदा सलग चौथ्या वर्षीही पंढरी सायक्लोथॉन-२०२४ चे आयोजन केले, असून सध्या यासाठीची नांव नोंदणी सुरु असुन यामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन पंढरी सायक्लोथॉन आयोजक व आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी केले आहे.

पंढरीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रातील अनेकाच्या योगदानासह लोकसहभागातून आयोजित कलेल्या पंढरी सायक्लोथॉनचा शुभारंभ राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, पंढरीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तथा प्रशासकीय अधिकारी यांच्या शुभहस्ते रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ६:३० वाजता पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक-प्रबोधनकार ठाकरे चौक, लिंकरोड मार्गे, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक चौक, भादुले चौक ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा पध्दतीने ही सायक्लोथॉन चा समारोप होणार आहे.

या सायक्लोथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी शाालेय विद्यार्थ्यांसह युवा वर्गाला व ज्येष्ठांना ऑनलाईन अर्ज करून सहभाग नोंदवण्याचे आवाहन केलं आहे. यात प्रामुख्याने सहभागी होत असलेल्या सायकलस्वारांना टीशर्ट, प्रमाणपत्रासह खाऊचे वाटप केले जाणार असुन, टीशर्ट च्या मोजमापाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था केली गेली आहे.

त्यासाठी https://surveyheart.com/form/618eb5c4736f282409fcf777 या साईटवर ऑनलाईन नोंद करता येईल तसेच ऑफलाईन अर्ज १)जंबो झेरॉक्स, जुन्या एस.टी. स्टॅन्स समोर, २)सायली जनरल स्टोअर्स, भगवा चौक, पंढरपूर, ३)ममता मेडीकल, सोलापूरे नगर, टाकळी रोड, पंढरपूर, ४)स्वराज एंटरप्रायझेस, भक्ती मार्ग पंढरपूर या ठिकाणी अर्ज उपलब्ध आहेत. 

नोंदणीसाठी  क्युआर कोड स्कॅनींग, अर्जाची लिंकही सहभागी सायकलस्वारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे विश्वस्त राधेश बादले-पाटील (साहित्यीक), सतीश माने, गणेश थिटे, शेखर भोसले, विठ्ठल भुमकर, निलेश कदम, ओंकार चव्हाण आदींनी केलं आहे. 

यासंबंधीचे नियोजन, व्यवस्थापन स्वेरी इंजिनियरिंग कॉलेजसह पंढरीतील अनेक शाळा-महाविद्यालये करीत आहेत. तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायकलची आवड निर्माण व्हावी, म्हणून व पर्यावरणपूरक इंधन बचतीसाठी आपण विद्यार्थ्यांसह स्वतः हजर राहून सहकार्य करावे, अधिक महितीसाठी मोबाईल क्रमांक 9823079170 यावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे.