भंडारा-गोंदिया : निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षाचे नेते, मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनाचा पाऊस पाडतात. जे पराभूत होतात, त्यांचा प्रश्न वेगळा, मात्र जे उमेदवार निवडणूक जिंकतात त्यांना व त्यांच्या पक्षालाही त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. अगदीच १५ लाखाचा आश्वासन त्यापैकीच एक आहे. ते आश्वासन विनोदाने दिले होते असं म्हणणारी माणसं आज केंद्रात सत्तास्थानी आहेत. मात्र निवडणुकीत मी यशस्वी झालो तर मतदारांना स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेली आश्वासनांची पूर्तता न केल्यास माझी सर्व चल-अचल संपत्ती मतदारांची असणार आहे, असं अभय डी. रंगारी यांनी म्हटलं आहे.
२०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अभय डी. रंगारी इच्छुक उमेदवार आहेत. ""भंडारा - गोंदिया ""लोकसभा क्षेत्रातून वा देशातील अन्य कोणत्याही लोकसभा क्षेत्रातून निवडणूकीला उभे राहणार आहेत. निवडणूक रिंगणात करणारे सर्व उमेदवार आपल्या संपत्तीचा लेखाजोखा उमेदवारी अर्ज सोबत जोडत असतात मात्र अजय रंगारी यांनी ते स्टॅम्प पेपरवर ' समस्या आणि समाधान कार्ड ' नावाखाली निवडणूक जाहीरनामा घोषित करणार आहेत, अंसं रंगारी यांची भूमिका आहे.
सुप्रसिद्ध कवी अशी अभय डी. रंगारी यांची जनमाणसांत ओळख असून ' मिठा झूठ, कडवा सच ' या प्रकारच्या राजकीय , सामाजिक व पर्यावरणिय कविता लिहितात. त्यांचे ०२ कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी असून, त्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांचा समावेश आहे. ते मुक्त पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व आजमितीला बहुजन मुक्ती पार्टी (BMP) या राष्ट्रीय पार्टीच्या भंडारा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य व मीडिया प्रभारी या पदावर कार्यरत आहेत. जनतेची कोणतीही समस्या असो त्यात ते आंदोलनाच्या स्वरूपात भाग घेऊन त्या समस्याचे निराकरण शासन दरबारात तत्परतेने करतात.
लोकसभा निवडणुकीत अभय रंगारी निवडून आले आणि त्यांनी जर स्टॅम्प पेपरवर जो जाहीरनामा घोषित केला होता, तो पाच वर्षात पूर्ण केला नाही तर, अभय डी. रंगारी यांची जेवढी संपत्ती आहे, ती सरकार जमा होईल किंवा त्या संपत्तीवर त्या क्षेत्रातील मतदारांचा अधिकार राहील, असे ते स्टॅम्प पेपरवर लिहून देऊन मगच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मतदारांच्या रणांगणात मतदारांना मत मागण्यासाठी फिरणार आहेत, तो प्रतिज्ञा लेख देशातील एकमेव उदाहरण असावे, असे दिसते.