पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेळगी ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

shivrajya patra


सोलापूर : शेळगी (पोलीस चौकी) ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करणे तसेच ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन शुक्रवारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता विकास कामांसाठी ११ कोटी ४६ लाख तर ड्रेनेज लाईन साठी ४५ लाख इतका निधी मंजूर आहे.


यावेळी खासदार जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, किरण देशमुख, मोहन डांगरे, हरी  सरवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे अन्य मान्यवर यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

To Top