Type Here to Get Search Results !

भाजपा महिला मोर्चा दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदी निलिमा शितोळे यांची नियुक्ती



सोलापूर : विजापूर रोड सैफुल परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या निलिमा शितोळे यांची भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर मोर्चाच्या दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र माजी मंत्री तथा दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिले. यावेळी महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली उपस्थित होत्या.

निलिमा शितोळे या सैफुल विजापूर रोड परिसरात वैष्णवी सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी या भागात महिलांचे चांगले संघटन केले असून या कार्यालया राजकीय जोड मिळावी म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून महिला मोर्चाच्या दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्षपदावर नियुक्ती देण्यात आली. 

यावेळी संदीप हेसे, अनुप कुलकर्णी, अनुप्रीत शितोळे, शोभा देशपांडे, शशिकला पाटील, शैला लहाने, आसावरी देशपांडे, गायत्री देसाई, सरिता भिसे, पल्लवी हजारे आदी महिलांची मोठी गर्दी होती.