पुळुज / दत्तात्रय पांढरे
७५ व्या प्रजासत्ताक दिनी, ग्रामपंचायत कार्यालयाचं ध्वजारोहण नूतन लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले तर लिंगेश्वर विद्यालयाचे ध्वजारोहण पांडुरंग ताटे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. लिंगेश्वर विद्यालयच्या व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण गीत सादर केले. ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकरिता विंधन विहिरीमध्ये विद्युत पंप सोडण्यात आला. त्याचं पुजन सरपंच विश्वास महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांची सुंदर अशी भाषणे झाली. सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायततर्फे गोळ्या-बिस्किट, चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर सरपंच विश्वास महाडिक यांनी जिल्हा परिषद शाळा, कोंडकर वस्ती येथे जाऊन स्नेहसंमेलनास उपस्थिती लावली. यावेळी सरपंच महाडिक यांचा कोंडकर वस्ती शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांनी शाळेस पाच हजार रुपये सस्नेह भेट दिले. चिमुकल्यानी देशभक्तीपर सुंदर असे गाणे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.