सोलापूर : पोलीस विभागाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांच्या सेवा कालावधीत बजावलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरीबद्दल दरवर्षी सन्मानार्थ राष्ट्रपती, भारत सरकार यांचेकडून उत्कृष्ट व विशेष पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत असते. प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर येथे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्राप्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल भिवाजी दोरगे, व महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिमा आप्पाशा डोंगरीतोट यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीप्रत्रक देऊन गौरविण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आस्थापनेवर कार्यरत असलेले राष्ट्रपती पदक प्राप्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल भिवाजी दोरगे (नेमणूक - गुन्हे शाखा), व महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिमा आप्पाशा डोंगरीतोट (नेमणूक - विशेष शाखा) यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीप्रत्रक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, म.न.पा आयुक्त श्रीमती शितल तेली-उगले, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनिषा आव्हाळे, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगांव-सोलापूर चे प्राचार्य श्रीमती वैशाली कडुकर, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. १०, सोलापूरचे समादेशक विजयकुमार चव्हाण तसेच इतर पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.