Type Here to Get Search Results !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चार हुतात्मा पुतळा परिसरातील सुशोभीकरणाचे लोकार्पण


सोलापूर : सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाचे  कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्रीकिसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा अ.कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 



त्यानंतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वंशज श्रीमती अन्नपूर्णा धनशेट्टी व हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दीनानाथ शिंदे तसेच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे वंशज (मुलीचा मुलगा) हसीमोद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नरेंद्र काळे, नगर अभियंता सारिका आकूलवार, उपअभियंता किशोर सातपुते, कनिष्ठ अभियंता परशुराम भुमकंटी, बिरू बंडगर, विजयकुमार गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.



महापालिका इमारतीला भेट

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सोलापूर शहरातील वारसा स्थळापैकी सोलापूर महानगरपालिकेची इंद्रभुवन या इमारतीचे नुतनीकरण कामास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.  यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी इंद्रभवन इमारतीचे नूतनीकरण संदर्भातील  संपूर्ण माहिती त्यांना दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकूलवार, उप अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.