सोलापूर : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश शिवाजीराव जाधव हे गुरुवारी, ०१ फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरूवारी, ०१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे, जिल्हाधिकारी, सोला .पूर यांच्या समवेत जिल्ह्यातील मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सन १९६० ते २०२० या कालावधीतील जमिन धारणेविषयी बैठक व महानगरपालिका आयुक्त, सोलापूर यांचा सर्वेक्षणाचा आढावा. दुपारी ०१.०० वाजता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर. येथे मा.कुलगुरू व कुलसचिव, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या समवेत उच्च शिक्षण शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या प्रवर्गनिहाय स्थितीबाबत आढावा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.