Type Here to Get Search Results !

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमहाराष्ट्र केसरी सादिक पठाण वंचित बहुजन आघाडीत !


आर्थिक दुर्बल पहेलवानांना चांगल्या तालमीत प्रवेश मिळवून देण्यासाठी राजकारणात पदार्पण : सादिक पठाण

पंढरपूर : मी पैलवान होण्यासाठी खुप खडतर परिस्थिती अनुभवली, संघर्ष करावा लागला. माझ्या वाट्याला जो संघर्ष आला तसा संघर्ष पैलवान होऊ इच्छिणार्‍या इतर तरूणांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून तळागाळातील सर्वसामान्यांसाठी काम करणार्‍या वंचित बहुजन आघाडी त प्रवेश केला असून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब पैलवानांना न्याय मिळवून देण्यासाठी व ज्यांची परिस्थिती गरीबीची आहे, त्यांना चांगल्या तालमीत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, असं पैलवान सादिक पठाण यांनी यावेळी म्हटले.

पंढरपूर तालुक्यातील उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सादिक पठाण (रा.पेहे) यांचा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश झाला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका व पंढरपूर शहर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवारी, यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, व पैलवान सादिक पठाण यांनी पंढरपूर येथे प्रसिध्दी माध्यमांसमोर अधिक माहिती दिली.


चांगला खुराक व चांगलं खायला भेटत नाही, त्यामुळे गरीब घरातील पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन होऊ शकत नाही, महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाही, त्यांची स्वप्न अधुरीच राहतात. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

गोरगरीब पैलवानांना चांगली तालीम भेटली पाहिजे व चांगला खुराक भेटला पाहिजे, यासाठी व वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वाढीसाठी मी सतत प्रयत्न करत राहीन. असेही त्यांनी यावेळी म्हटले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संघटक राहुल बोरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, तालुका उपाध्यक्ष शंकर वाघमारे,पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, पंढरपूर शहर युवा अध्यक्ष वसीम बेदरेकर , शहर महासचिव सुनिल दंदाडे, शहर उपाध्यक्ष आप्पासाहेब वाळखे, शहर सचिव विकास बंगाळे, दत्ता थोरात, बाळू आधटराव, संतोष आगवणे, तसेच सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका व पंढरपूर शहरचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.