सोलापूर : गुन्ह्यात प्रथमदर्शनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही, दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे, गुन्हा हा गंभीर स्वरूपात रूपांतर होण्याची शक्यता नाही, असा आरोपीच्या वकिलानी केलेला युक्तीवाद, न्यायालयाने ग्राह्य धरून विरप्पा चंदु शिंदे याची ५० हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला.
१२ जून २०२३ रोजी बद्री पवार यांनी एम. आय. डी. सी. पोलिस ठाण्यात विरप्पा चंदु शिंदे वगैरे लोकांनी तलवारीने जीवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिंसकावून घेतल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी विरप्पा शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येऊन, आरोपीस अटक करण्यात आली होती.
अँड. अजमोद्दीन शेख यांनी आरोपी विरप्पा चंदु शिंदे यांच्या वतीने सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या कोर्टात आरोपीस जामीन मिळण्याबद्दलचा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आरोपीच्या वतीने अँड. अजमोद्दीन शेख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन, न्यायालयानं आरोपीचा जामीन मंजूर केला.
याकामी अँड. अजमोद्दीन शेख, अँड. सैफोद्दीन शेख यांनी काम पाहिले.