Type Here to Get Search Results !

विद्यापीठाचा २१ फेब्रुवारीला दीक्षांत सोहळा !


राज्यपाल रमेश बैस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा दीक्षांत सोहळा बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी होणार असून या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महामहीम राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दीक्षांत सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. विविध समित्या यासाठी गठीत करण्यात आल्या आहेत. मंगळवारी कुलगुरू प्रा. महानवर यांनी  याचा आढावा घेतला. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा यांची उपस्थित होती.

बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. तसेच पद्मभूषण प्रा. एम. एम. शर्मा हेही यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना विविध पदव्या, पदव्युत्तर पदवी, सुवर्णपदकांचे वितरण होणार आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे.