सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत दरवर्षी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना, प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात येते. यंदाच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार शरणबसवेश्वर वांगी, गुणवंत खेळाडू पुरस्कार (मुली) सृष्टी श्रीकांत शेटे, गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२२-२३ (मुले) वरुण श्रीकांत दोरनाल आणि
जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२२-२३(गुणवंत दिव्यांग खेळाडू) आकुताई सिताराम उलभगत यांना जाहीर झाला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी दिलीय.
या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख बक्षिस १० हजार रुपये असं आहे. सन २०२२-२३ चे क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीचा मान मिळवलेले खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या हस्ते ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, असंही पवार यांनी सांगितलंय.
.........
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार २०२२-२३
शरणबसवेश्वर सिद्धाराम वांगी
शिक्षण: BA.M.P.ed P.hd in solapur University
संगमेश्वर रात्र महाविद्यालय, सोलापूर येथे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहे. स्वतः हँडबॉल या खेळाचे राष्ट्रीय व विद्यापीठ खेळाडू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास ५० ते ६० राष्ट्रीय खेळाडू व श्रेयस मालप हा आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविला आहे. आतापर्यंत त्यांनी चार ते पाच वेळा महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघाचा मार्गदर्शक म्हणून अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कार्याचा मूल्यमापन करुन त्यांना २०२२-२३ या वर्षाचा गुणवंत जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येत आहे
........
गुणवंत खेळाडू पुरस्कार २०२२-२३ (मुली)
सृष्टी श्रीकांत शेटे (शिक्षण Tech C.S.E.)
यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून जलतरणाचे सराव त्यांच्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली घेत होते, त्यांनी २०१२ मध्ये दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले असून तसेच आतापर्यत आठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविले असून त्यांना ०५ पदके मिळाली आहेत. तिसऱ्या वर्षी साऊथ वेस्ट झोन मध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून कार्याचं मूल्यमांपन करुन त्यांना सन २०२२-२३ गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार (मुली) देण्यात येत आहे.
..........
गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२२-२३ (मुले)
वरुण श्रीकांत दोरनाल (शिक्षण: B.Tech E.C..E)
यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून जलतरणाचे सराव त्यांच्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे त्यांनी आतापर्यत दहा राष्ट्रीय जलतरण / डायव्हिंग स्पर्धेतध्ये सहभाग नोंदविले असून आतापर्यत त्यांना ०५ सुवर्ण व ०१ कास्य पदके मिळविली आहेत. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून कार्याचा मूल्यमापन करुन त्यांना सन २०२२-२३ गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार (मुले) देण्यात येत आहे.
..............
जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२२-२३(गुणवंत दिव्यांग खेळाडू)
आकुताई सिताराम उलभगत (शिक्षण :- M. A.)
सन २०२१-२२ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या मानकरी असून सन २०१५ पासून महाराष्ट्र पॅरा अॅथलेटिक्स या खेळामध्ये थाळी व गोळा या खेळ प्रकारामध्ये खेळत आहेत. आतापर्यंत या खेळात एकूण पदके २१ मिळविले आहेत. सुवर्ण-१३ व रौप्यपदक ०७ तर कांस्यपदक - ०१ असे आहेत. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून कार्याचा मूल्यमांपन करुन त्यांना सन २०२२-२३ गुणवंत दिव्यांग खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येत आहे.